You are currently viewing कुडाळ तालुक्यातील २०२२ ते २०२५ मध्ये झालेल्या सर्वच रस्त्यांची कामांची चौकशी व्हावी,,,, श्री अतुल बंगे

कुडाळ तालुक्यातील २०२२ ते २०२५ मध्ये झालेल्या सर्वच रस्त्यांची कामांची चौकशी व्हावी,,,, श्री अतुल बंगे

कुडाळ तालुक्यातील २०२२ ते २०२५ मध्ये झालेल्या सर्वच रस्त्यांची कामांची चौकशी व्हावी,,,, श्री अतुल बंगे

कुडाळ (प्रतिनिधी)

कुडाळ तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (pwd) खात्या मार्फत झालेल्या २०२२ ते २०२५ पर्यंत झालेल्या सर्वच रस्ता कामांची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केली आहे
श्री बंगे यांनी बोलताना सांगितले की सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री जयकुमार पिसाळ यांनी कार्यभार स्विकारल्या पासुन कुडाळ तालुक्यातील रस्त्यांच्या कामांमधे मोठ्या प्रमाणात अपहार झाला असुन याची वाच्यता करुनही श्री पिसाळ यांच्या वर कोणतीच कारवाई झाली नसुन कुडाळ तालुक्यातील रस्त्यांची कामे होऊन सुध्दा रस्त्यांची चाळण झाली असुन नावाला कामांची एजन्सी दाखवुन आपल्याच विभागातील शाखा अभियंता कर्मचारी यांच्या मार्फत ठेके घेतले जातात या मध्ये मुख्य सुत्र धार श्री पिसाळ असुन सन २०२२ ते २०२५ या कालावधीत झालेल्या रस्त्यांच्या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी श्री बंगे यांनी करुन श्री पिसाळ यांची या कुडाळ तालुक्यातुन बदली झाल्याशिवाय रस्त्यांच्या कामांमधील भ्रष्टाचार थांबणार नसुन आपण थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या कडे तक्रार करणार असुन श्री पिसाळ यांचा कोणी तरी कर्ता करविता मंत्रालयात बसलेला आहे याची कल्पना आपल्याला आहे असे सांगून श्री बंगे म्हणाले तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने झालेल्या कामांच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढल्या शिवाय आपण गप्प बसणार नसल्याचे श्री बंगे यांनी सांगितले

प्रतिक्रिया व्यक्त करा