You are currently viewing विज ग्राहकांचा विज पुरवठा खंडीत करु नये….

विज ग्राहकांचा विज पुरवठा खंडीत करु नये….

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.

वैभववाडी

वैभववाडी तालुक्यासह जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अवाजवी बिले आली आहेत. याचाच फायदा घेत अनेकांचा वीज पुरवठा वीज कंपनीने खंडित केला आहे. विना नोटीस वीजपुरवठा खंडित करू नये व अवाजवी आलेली बिले कमी करावीत अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलव्दारे केली आहे. सदर विनंती पत्राची प्रत मा.अधिक्षक अभियंता, कुडाळ, मा.कार्यकारी अभियंता,कणकवली, मा.तहसिदार, वैभववाडी व मा. उपकार्यकारी अभियंता, वैभववाडी यांना पाठविल्या आहेत. कोरोनाच्या काळात मा.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी १०० युनिटच्या आतील बिले माफ करू असे आश्वासन दिले होते.त्यामुळे अनेक गोरगरीब वीज ग्राहकांनी वीज देयके भरली नव्हती. वीज देयके माफ तर सोडाच उलट त्यावर व्याज आकारून गोरगरिबांना बिले देऊन वीजबिल वसुली चालू केली आहे. विज बिलाची रक्कम लहान असो अगर मोठी असो तात्काळ भरणा करण्याचा तगादा विज मंडळाकडून केला जात आहे.
कोरोनाच्या काळात अनेकांचे धंदे बंद पडले. काही व्यावसायिकांचे दिवाळे निघाले. सरकारकडून कोणतीच मदतही मिळाली नाही. पण सरकारच्या आधिपत्याखाली असणारी वीज कंपनी मात्र जनतेला वाढीव बिल देऊन वीज ग्राहकांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास देत आहेत. तात्काळ वीज कनेक्शन खंडित करून व्यावसायाचे सुद्धा नुकसान करीत आहेत. वीज ग्राहकांना आलेली अवाजवी बिले कमी करून द्यावी, गोरगरिबांना बिलाचे हप्ते करून द्यावेत, नोटीस न देता वीज कनेक्शन खंडित करू नये अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने केली आहे. कायद्याप्रमाणे ग्राहकांना जे हक्क आहेत ते वीज ग्राहकांना मिळावेत. अनधिकृतपणे वीज कनेक्शन खंडित केल्यास होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.वीज वितरण कायदा २००३ कलम ५६ नुसार पंधरा दिवसांची नोटीस दिल्याशिवाय पुरवठा कापला जाऊ शकत नाही. जर नोटीस न देता खंडित केल्यास कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कलम २१७, २०१८ प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो असा ग्राहकास अधिकार आहे. आम्ही ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने दिलेल्या विनंती अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती संस्थेचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची अशासकीय सदस्य प्रा.श्री.एस. एन.पाटील, उपाध्यक्ष श्री. एकनाथ गावडे, संघटक श्री.सिताराम कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसणकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा