You are currently viewing जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्यातील बेस्ट देण्याचा प्रयत्न करा…

जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्यातील बेस्ट देण्याचा प्रयत्न करा…

*जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्यातील बेस्ट देण्याचा प्रयत्न करा…*

*कुडाळ तहसीलदार मा.श्री वीरसिंग वसवे…!*

कुडाळ:

२५ मेरा युवा भारत (MY Bharat), सिंधुदुर्ग च्या वतीने शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगाव संचालित, परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय साळगाव येथे सोमवार दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता भारत सरकारच्या प्रमुख योजनांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आले. याप्रसंगी कुडाळ तालुक्याचे तहसीलदार सन्माननीय श्री.वीरसिंग वसावे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले तर प्रमुख मान्यवर कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी मा.श्री.प्रफुल्ल वालावलकर, शिक्षण प्रसारक मंडळ झाला पंचक्रोशी साळगाव संस्थेचे उपाध्यक्ष मा. भास्कर बाळा परब, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर पं. स. कुडाळचे गट समन्वयक मा.श्री.सुनील सदाशिव प्रभू, तहसीलदार कार्यालय कुडाळचे निरीक्षण अधिकारी मा.श्री.पंकज देविदास नवले, कुडाळ खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक मा.श्री नंदकिशोर करावडे, नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गचे माजी समन्वयक मा श्री जयराम जाधव, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास सिंधुदुर्गचे मा.श्री. भैय्याजी गोविंद दाजी येरमे, असेच अनुभव शिक्षा केंद्र जिल्हा प्रशिक्षक मा.श्री.सहदेव पाटकर हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे रोप व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविक करताना अशा विविध उपक्रमांचा महाविद्यालयीन विद्यार्थी समाजात वावरताना याचा निश्चितच प्रसार आणि प्रचार करतील त्यामुळे अशा विविध उपक्रमाची कार्यशाळा माझ्या महाविद्यालयात होत असल्याचा मला आनंद आहे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर म्हणाले.
गटविकास अधिकारी,
कमवा आणि शिका आपल्यातील कलेचा वापर करून त्याचा व्यवसाय करून पैसे कसे मिळवता येतील याचा विचार करा .आपल्याकडील कौशल्य विकसित करा . असे प्रेरणादायी विचार कुडाळचे गटविकास अधिकारी मा श्री. प्रफुल्ल वालावलकर यांनी मांडले

तहसीलदार,
जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्यातील बेस्ट देण्याचा प्रयत्न करा प्रशासनाच्या योजनांचा लाभ घ्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या प्रा. भक्ती चव्हाण यांनी केले तर आभार नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गचे माजी स्वयंसेवक मा.श्री सहदेव पाटकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा