*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हरितालिका व्रत*
हरतालिका व्रत
पार्वतीने शंकरासाठीकेले
सुयोग्य वरले
पती…..
असाध्य काही
नसते बघा जगतात
पार्वती वनात
तपस्विनी…
योग्य निर्णय
तेव्हा तिने घेतला
परिपूर्ण जाहला
व्रतसंकल्प…
त्रैलोक्याचा स्वामी
योगी अभोगी भणंग
सदा सत्संग
तपाचा….
विचारपूर्वक वागावे
सुयोग्य निर्णय घ्यावे
तडीस न्यावे
मनातले…..
विश्वास सार्थ
परिश्रमाने नित्य करावा
मार्ग निवडावा
विचाराने…..
आजची हरतालिका
केवळ कथेत नाही
शिकावे काही
माध्यमातून…..
अरुणा दुद्दलवार @✍️

