*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम अभंग रचना*
*वंदन श्रीगणेशा*
प्रथम वंदन ! तुज गणपती !
करुनी आरती ! कार्यारंभी !!१!!
लाल फुले अन् ! चरणासी दुर्वा !
आशीर्वाद सर्वा ! तुझा लाभो !!२!!
मूषकवाहन ! तूचि एकदंता !
शिरी कृपावंता ! ठेवी हात !!३!!
सुखकर्ता होसी ! दुःखास हारिशी !
भक्तांच्या पाठीशी ! नित्य उभा !!४!!
अनंत ब्रम्हांडे ! तुझिया उदरी !
सकळांच्या उरी ! सदा वसे !!५!!
©[दीपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

