You are currently viewing फोंडाघाट बाजारपेठेत गणेशोत्सवाची धामधूम;

फोंडाघाट बाजारपेठेत गणेशोत्सवाची धामधूम;

फोंडाघाट बाजारपेठेत गणेशोत्सवाची धामधूम;

व्यापाऱ्यांमध्ये उत्साह, अजित नाडकर्णींची भेट

फोंडाघाट

फोंडाघाट बाजारपेठ गजबजलेली असून श्री गणेशाच्या आगमनामुळे परिसरात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. बाजारात फळबाजार, भाजीबाजार, भांड्यांची दुकाने, लाईटची दुकाने, तोरणं, शहाळी, हरताळिका, मूर्ती बाजार, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिकांची गर्दी दिसून येत आहे. सर्वत्र गणेशोत्सवाच्या तयारीची धामधूम असून नागरिकांमध्येही विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर अजित नाडकर्णी यांनी फोंडाघाट बाजारपेठेला भेट देऊन सर्व व्यापाऱ्यांशी संवाद साधला. गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या वर्दळीमुळे चेकपोस्टवर येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याच्या बाटल्यांची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, बाजारपेठेत होणाऱ्या वाहतूक व्यवस्थेच्या अडचणी लक्षात घेता सर्व व्यापाऱ्यांनी रस्त्यावर वाहनं न लावता होमगार्डसना सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं. या आवाहनाला सर्व व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं.

फोंडाघाट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यांनीदेखील पूर्ण सहकार्य करण्याची तयारी व्यक्त केली असून व्यापारी मंडळ नेहमीच समाजोपयोगी उपक्रमांमध्ये पुढाकार घेतं, असं त्यांनी नमूद केलं.

फोंडाघाट ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रवेशद्वार मानली जाते आणि या गावाबद्दल मंत्री नितेश राणे हे नेहमीच गौरवोद्गार काढतात, याचा सार्थ अभिमान असल्याचं अजित नाडकर्णी यांनी सांगितलं.

– अजित नाडकर्णी, संवाद मीडिया

 

प्रतिक्रिया व्यक्त करा