गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवाशाकडून जादा भाडे आकरणी झाल्यास उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार नोंदवा
सिंधुदुर्गनगरी
गणेशोत्सव कालावधीमध्ये खासगी कंत्राटी वाहनांचा वापर करणाऱ्या प्रवाशाकडून राज्य परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या दराच्या दिडपट पेक्षा जास्त भाडे आकारणी झाल्यास उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार नोंद करण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी केले आहे.
राज्यातील प्रवास करणाऱ्या प्रवशांकडून मोठ्या प्रमाणात खासगी कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. अशा प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून खासगी कंत्राटी वाहतुकी ने आण करणाऱ्या वाहतुकदारांकडून गर्दीच्या हंगामामध्ये अवाजवी भाडेवाढ करण्यात येते.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे, राज्य परिवहन प्राधिकरण (STA) ने ठरवून दिलेल्या दरपत्रक खालीलप्रमाणे असून कोणत्याही खासगी बस वाहतुकदाराने या दराच्या 50 टक्के अधिक (दिडपट) आकारणी करण्यास परवानगी असून या दराच्या दिडपट पेक्षा जास्त भाडे आकारणी करुन नये.
| अ.क्र | मार्गाचे नाव | तिकिट दर (साधी) | तिकिट दर
(शिवशाही ) |
तिकिट दर (स्लिपर) |
| 1 | मुंबई ते सावंतवाडी | 865/- | 1280/- | 1270/- |
| 2 | मुंबई ते कुडाळ | 835/- | 1235/- | 1225/- |
| 3 | मुंबई ते कणकवली | 775/- | 1146/- | 1137/- |
| 4 | मुंबई ते मालवण | 845/- | 1250/- | 1240/- |
| 5 | मुंबई ते वेंगुर्ला | 875/- | 1295/- | 1284/- |
| 6 | मुंबई ते देवगड | 815/- | 1107/- | 1196/- |
| 7 | पुणे स्टेशन ते सावंतवाडी | 640/- | 981/- | 871/- |
| 8 | पुणे स्टेशन ते कुडाळ | 654/- | 968/- | 960/- |
| 9 | पुणे स्टेशन ते कणकणवली | 594/- | 878/- | 871/- |
| 10 | पुणे स्टेशन ते मालवण | 694/- | 1027/- | 1019/- |
| 11 | पुणे स्टेशन ते वेंगुर्ला | 690/- | 1055/- | 945/- |
| 12 | पुणे स्टेशन ते देवगड | 634/- | 938/- | 930/- |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे, राज्य परिवहन प्राधिकरणा (STA) ने ठरवून दिलेल्या दराच्या दिडपट पेक्षा जास्त भाडे आकारणी झाल्यास प्रवाशांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक 02362-229050 वर तसेच कार्यालयाच्या dyrto.07-mh@gov.in या ईमेल आयडीवर किंवा मोटार वाहन निरीक्षक संदीप भोसले मोबा. 9822445008, निलेश ठोंबरे मोबा. 8208729017 या भ्रमणध्वनीवर वाहनाची नोंदणी क्रमांक व भाडे आकारणी तिकीट यांच्या फोटोसह आपली तक्रार नोंदवावी, असे प्रसिध्दी प्रत्रकाव्दारे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
