सौ. साक्षी लाड यांची शिवसेना महिला विभाग प्रमुखपदी घावनळे विभागात नियुक्ती
माणगाव : कुडाळ
कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे तसेच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या आदेशावरून घावनळे विभागाच्या महिला विभाग प्रमुखपदी सौ. साक्षी आनंद लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सौ. लाड यांच्या सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग आणि नेतृत्वगुण लक्षात घेता त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडून पक्ष संघटन बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान अपेक्षित आहे.
या निवडीमुळे घावनळे विभागात शिवसेनेच्या महिला आघाडीला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. सौ. लाड यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून, स्थानिक पातळीवर याचे विशेष कौतुक केले जात आहे.
