You are currently viewing बीकेव्हीटीआय रत्नागिरी तर्फे टेरारियम कार्यशाळा संपन्न

बीकेव्हीटीआय रत्नागिरी तर्फे टेरारियम कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी :

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचालित बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इंस्टिट्यूट (BKVTI), रत्नागिरी यांच्या वतीने शनिवार, दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी बीकेव्हीटीआय, मारुती मंदिर येथे टेरारियम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत टेरारियम कसे बनवावे, त्यासाठी लागणारे इंडोर प्लांट्स व साहित्य याची सविस्तर माहिती देण्यात आली. बीकेव्हीटीआय तर्फे आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच इंटेरियर डिझाईन डिपार्टमेंटच्या विद्यार्थिनींनी मिनिएचर मॉडेल्स तयार करून सहभाग नोंदवला.

सुशोभीकरणासाठी टेरारियमचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शनही करण्यात आले. ही कार्यशाळा कु. सिद्धी करंदीकर यांच्या हस्ते पार पडली.

या प्रसंगी डॉ. राखी लांजेकर, सौ. रूपाली सावंत, सौ. योगिता वणजु, सौ. प्रतिभा खेडेकर व सौ. तृप्ती भूरखे यांनी सहभाग घेतला. उत्साही व आनंदी वातावरणात ही कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा