“सलग १८ वर्षे अध्यक्षपद सांभाळणाऱ्या सुखाजी गवस यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड!”
दोडामार्ग
झोळंबे गावचे ज्येष्ठ व अनुभवी सामाजिक कार्यकर्ते श्री. सुखाजी सोमा गवस यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली आहे. झोळंबे ग्रामस्थांनी त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. गेली सलग १८ वर्षे त्यांनी या पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत गावात शांतता व सामंजस्य टिकवण्याचे महत्त्वाचे काम केले आहे…
