You are currently viewing वि.स.खांडेकर विद्यालयामध्ये वह्या वाटप व खेळाडूंचा सत्कार संपन्न

वि.स.खांडेकर विद्यालयामध्ये वह्या वाटप व खेळाडूंचा सत्कार संपन्न

*वि.स.खांडेकर विद्यालयामध्ये वह्या वाटप व खेळाडूंचा सत्कार संपन्न *

सावंतवाडी

भारतीय जनता पार्टी सावंतवाडी शहर मंडला च्या वतीने वि.स.खांडेकर विद्यालय सावंतवाडी मध्ये सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.आदरणीय ना.रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्या वाटप हा कार्यक्रम करण्यात आला व वि.स.खांडेकर विद्यालयातील विभागीय रोलर स्केटिंग 17वर्षाखालील स्पर्धेसाठी जान्हवी दिपक जाधव व जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी आदर्श पाटील यांची निवड करण्यात आली यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सावंतवाडी भाजप शहर अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, सरचिटणीस दिलीप भालेकर, संजू शिरोडकर जिल्हा कार्यकारणी सदस्य, मा.नगरसेवक आनंद नेवगी व जिल्हा कार्यकारणी सदस्या व मा.नगरसेविका सौ.दिपाली भालेकर तसेच श्री.राजाराम पवार मुख्याध्यापक श्री.सतिश धुमाळे श्री.श्रीशैल परीट, श्री.सुरेश कोळी सौ.सारिका शृंगारे व सौ.मयुरी इन्सुलकर व विद्यार्थी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा