You are currently viewing श्री रामेश्वर हायस्कूल मिठबावच्या माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा 

श्री रामेश्वर हायस्कूल मिठबावच्या माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा 

देवगड –

 

श्री रामेश्वर हायस्कूल मिठबावच्या सन १९८० एस एस सी वर्गातील विद्यार्थी मित्र-मैत्रिणी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येण्याचे ठरविण्यात आले. खरं तर एवढ्या कालावधी नंतर प्रत्येकाला शोधायचे कसे असा यक्षप्रश्न होता. १९८० असा व्हाट्सअप समुहातून एकाएका मित्र ,मैत्रिणी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक मिळविण्याचे शिवधनुष्य लीलया पार पाडत दि. १४ मे २०२४ हा दिवस निवडला गेला. या कामी आनंद लोके, जयानंद फाटक, प्रमोद कांदळगावकर अशी त्रिसदस्यीय समितीने जबाबदारी संपूर्णपणे स्विकारण्याचे ठरले. आज प्रत्यक्षात जेव्हा एकत्र झालो. त्याक्षणी कुणी कुणाला कसे ओळखावे मग एकमेकांनानी आपआपला परिचय द्यावा असे ठरले. सर्वांना सोईची होईल. यावर एकमत होऊन देवगड येथील स्नेहवर्धक सभागृह येथे मोठ्या संख्येने मित्र मैत्रिणी उपस्थित राहून शालेय जीवनातील आठवणी जाग्या केल्या. तद्वतच शिक्षकवृंदाच्या आठवणींना उजाळा देत असताना काही शिक्षक, मित्र मैत्रिणी आज आपल्यामध्ये नाहीत; त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना काहींच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. काहीजण म्हणाले की, अद्याप ते डोळ्यांसमोरून जात नाहीत. सकाळी दहा तीस वाजता सुरू झालेले हे स्नेहसंमेलन रंगतदार तेवढ्याच उत्साहात साजरे होत असताना संध्याकाळचे पाच केव्हा वाजले ते समजले नाही. आमची मैत्रिण निलम ढोलम या हायस्कूलच्या प्राचार्य झाल्या तर जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून रेणुका तेली यांनी काम पाहिले तर निसर्ग सौन्दर्याने नटलेल्या तांबळडेग गावाच्या सरपंचपद भुषविले यांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे उपस्थित मित्र- मैत्रिणींनी सांगितले. निर्मला खेडेकर, विजयालक्ष्मी डगरे, प्रदिप कोळंबकर, सुर्यकांत घाडी, लक्ष्मण खाडिलकर, दत्तात्रय टिकम, रवि लोके, विनोद पडवळ, मनोहर लोके, किशोर सरवणकर, शिवशंकर लोके, प्रविण लाड, सुहास वळंजू, प्रेमानंद ढोके, प्रमोद ढोके आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवन ऊर्जा येथील सुधारीत उद्यानाला भेट देऊन या शानदार सोहळ्याची सांगता झाली ती पुन्हा भेटण्याच्या एकमेकांना वचन देऊन या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रमोद कांदळगावकर यांनी मौलिक शब्दात केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा