You are currently viewing माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट…

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट…

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी भूमिका माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडली. यावेळी श्री. पवार यांच्याशी त्यांनी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा केली. राष्ट्रवादी फुटीच्या पार्श्वभूमीवर श्री. भोसले यांनी मुंबई येथे जाऊन पक्षाध्यक्ष पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. तसेच जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य आहे, असा यावेळी भोसले यांनी पवार यांना शब्द दिला

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =