*ज्येष्ठ लेखिका कवयित्री आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बैल पोळा*
आज पोळ्याचा सण
शेतकऱ्यांचं आनंदल मनं
भल्या पहाटे उठून
बैलांचे केले अभ्यंग स्नान
नाकात नवी वेसण
पायात छुमछुम पैंजण
शिंगांना गोंडे बेगड लावून
गळ्यात फुलांच्या माळा ,घंटी बांधून
अंगावर रंगीत झूल
बघुनी आनंदले, लहान थोर
जसे बाशिंग नवरदेवाला
आणले सजवून
हळद कुंकू लावून
ओवाळू निरंजन
पुरण पोळीचे आज खास भोजन
सोबतीला चारा पाण्याचे वैरण
ग्रामीण जीवन गेले फुलून
आज बैलांच्या विसाव्याचा दिन
दर वरीस येई, पोळ्याचा सण
सर्जा राजा , (बळीराजा )
करी शेतकऱ्यांच्या जीवनाचं सोन!
बळीराजा तुला त्रिवार वंदन !
अनुपमा जाधव
