You are currently viewing फोंडाघाट ग्रामपंचायतीला NDRF टीमची भेट; आपत्ती काळात तत्परतेचं दिलं आश्वासन

फोंडाघाट ग्रामपंचायतीला NDRF टीमची भेट; आपत्ती काळात तत्परतेचं दिलं आश्वासन

फोंडाघाट ग्रामपंचायतीला NDRF टीमची भेट; आपत्ती काळात तत्परतेचं दिलं आश्वासन

फोंडाघाट
फोंडाघाट ग्रामपंचायतीमध्ये नुकतीच राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दलाची (NDRF) टीम भेट देऊन स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेतला. या भेटीत ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, तलाठी गवस मॅडम, सर्कल अधिकारी, कोतवाल पांडू राणे, क्लार्क शितल पारकर, ग्रामविस्तार अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

NDRF टीमने गावात आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास त्वरित मदत आणि बचाव कार्यासाठी त्यांची टीम सदैव सज्ज असल्याचं सांगितलं. गावात आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती व प्रशिक्षणाची गरज असल्यास त्यासाठीही मदत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या टीमच्या कार्यक्षमतेचं आणि तत्परतेचं कौतुक करत अजित नाडकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं की, “आपत्तीच्या काळात ही टीम जशी तत्पर असते, तशीच आपणही त्यांचं कौतुक करायला हवं.”

प्रतिक्रिया व्यक्त करा