कणकवली :
जनजागृती सेवा संस्था यांच्या वतीने जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वाना मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर लावणी सिंधूचे चंद्रशेखर उपरकर, चौलेश्वरी महिला मंडळ अध्यक्ष राजश्री धुमाळे ,गोवा येथील समुपदेशक गुरव मॅडम, अभिनेत्री अक्षता कांबळी. गुरुनाथ तीरफनकर, गंधाली तिरफणकर, श्रुती उरणकर ,निवेदक तोरस्कर, आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी मालवण ,सावंतवाडी,कुडाळ,कणकवली,दोडामार्ग,वैभववाडी, देवगड वेगुर्ला अशा जिल्ह्यातील नामवंत व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
