घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ॥धृ. कालिंदीच्या तटी श्रीहरी तशात घुमवी धुंद बासरी एक अनामिक सुनंध येतो, ओल्या अंधारा ॥१॥ वर्षाकालिन सायंकाली लुकलुक करिती दिवे गोकुळी उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा ॥२॥ कृष्णविरहिणी कोणी गवळण तिला अडविते कवाड, अंगण अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा ॥३॥
*संग्रह@अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*🌂🌂🌂🌂⚡✨💥🌨️🫧💦

