You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १११ वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १११ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।। जय गजानन श्री गजानन ।।।। गण गण गणात बोते ।।

__________________________

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १११ वे.

अध्याय – १९ वा , कविता – ३ री

___________________________

 

बुटीला स्वामी बोलले । म्हणाले , तू मला इथेच ठेवून घेतले।

हे तुझे चुकले । जाऊ दे मज शेगावा ।। १।।

 

समर्थांचे हे सांगणे । ना ऐकिले बुटीने । राहती स्वामी बळजबरीने । बुटीच्या वाड्यात ।।२।।

 

हरी पाटील शेगावाहून निघाले । आगगाडीत बसले ।

स्वामी बुटीस म्हणाले । जाऊ दे मला ईथुनी ।।३।।

 

तुझ्या उड्या धनाच्या जोरावर । नाही हे बरोबर । हरी पाटील इथे आल्यावर । नेईल मला मनगटाच्या बळावर ।।४।।

 

बुटीच्या वाड्यात पंगत बसली खरी । थाटमाट त्याचा भारी । मध्यभागी आसनावरी । बैसली स्वामींची स्वारी ।।५।।

 

विदर्भ कुबेर ” बुटीस म्हणती । पाहुनी त्याची श्रीमंती ।

परी गर्व भारी त्याच्या चित्ती । प्रदर्शन तो करी ।।६।।

 

हरी पाटील आले । सदन द्वारी त्यास रोकिले । बाहेरच थांबविले । बुटीच्या शिपायाने ।।७।।

 

पाटलांनी त्यास ना जुमानले । ते सदनात आले । पाटलास पाहुनी स्वामी धावले । चाल हरी शेगावासी, स्वामी म्हणाले ।।८।।

************

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास ।।

__________________________

कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे- पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा