फोंडाघाटच्या जागृत देवस्थान श्री. गांगोमाऊलीच्या चरणी समाजसेवक अजित नाडकर्णी यांचे मनोभावे गार्हाणे;
शेवटच्या सोमवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी उपस्थिती
फोंडाघाट
आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने फोंडाघाटच्या ग्रामदैवत श्री. गांगोमाऊली देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. हे प्राचीन आणि जागृत देवस्थान असून, येथे बोललेला नवस हमखास पूर्ण होतो, असा भाविकांचा दृढ विश्वास आहे.
या निमित्ताने समाजसेवक श्री. अजित नाडकर्णी यांनीही आज गांगोमाऊली देवीच्या चरणी मनोभावे गार्हाणे घातले. त्यांनी देवीच्या दोन्ही मंदिरांना भेट देत आपल्या कुटुंबासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. “या ठिकाणी आल्यावर एक वेगळं आत्मिक समाधान लाभतं,” असं त्यांनी सांगितलं.
गुरव लाड कुटुंबीय पोटतिडकीने देवीच्या गार्हाण्याचं कार्य करत असून, श्रद्धा ठेवून जे काही मागितलं जातं त्याचा अनुभव भाविकांना वेळोवेळी येतो. माहेरवाशिणींसह अनेक भक्त दूरवरून येऊन देवीच्या चरणी नतमस्तक होतात.
फोंडाघाटचं हे देवस्थान श्रद्धेचं आणि भक्तीचं प्रतीक मानलं जातं. अशा या देवीच्या आशीर्वादाने समाजात सकारात्मक बदल व्हावा, अशी भावना आज अनेक भक्तांनी व्यक्त केली.
श्री गांगोमाऊली माते की जय! 🌺🙏
