You are currently viewing मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे गरजू लाभार्थ्यांना धनादेश प्रदान…

मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे गरजू लाभार्थ्यांना धनादेश प्रदान…

मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे गरजू लाभार्थ्यांना धनादेश प्रदान…

सावंतवाडी

सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम मध्ये सामंत ट्रस्ट मुंबई तर्फे गरजू व्यक्तींना धनादेश प्रदान करण्यात आले.

डिंगणे येथील रक्तदाब व्याधीने पिडित प्रकाश सुतार, मोरगाव येथील मधुमेह आणि रक्तदाब या आजाराने पिडीत शहाजी सावंत,कोंडूरे मळेवाड येथील अर्धांगवायू आणि अपंगत्व असलेले सुरेश पालयेकर आणि मधुमेह आणि रक्तदाब पिडित चांदणी मुळीक,बिरोडकर टेंब सावंतवाडी येथील रक्तदाब आणि दम्याच्या आजाराने त्रस्त गंगाराम बिरोडकर अशा पाच गरजू व्यक्तींना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी रुग्णांच्या नातेवाईकांनी सामंत ट्रस्ट व डॉ जयेंद्र परुळेकर यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा