You are currently viewing स्वागत गणराया

स्वागत गणराया

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*स्वागत गणराया..* 

 

मंद गंध श्रावणाचा,

मोहून जात असता !

येईल पुढे गंधांची,

बरसात नित्य आता!

 

प्राजक्त अंगणी डोले,

ऋतूगंध फुललेला!

का क्षणिक म्हणावे त्या

नाजूक जरी स्पर्शाला!

 

चाहूल लागता मना,

पाहुण्या गणरायाची!

अंथरल्या पायघड्या ,

अलगद् भूमी वरती !

 

विहरत जणू आला,

स्वर्ग तो धरणीवर!

सेतू बंधन बांधले ,

देव अन् पृथ्वीवर!

 

पाहुणा म्हणून येई,

गणराज हा घरात!

स्वागतास सज्ज झाली,

आतुर मने अंतरात!

 

उज्वला सहस्रबुद्धे,पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा