You are currently viewing धुरंधर श्रीकृष्ण

धुरंधर श्रीकृष्ण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”धुरंधर श्रीकृष्ण”* 

 

श्रीकृष्ण आहेत पुरुषोत्तम भगवान

पूर्ण अवतार पुरुष चतुरस्त्र चरित्रIIधृII

 

कृष्ण जन्माचे वेळी शिव होते समाधीस्थ

जन्म वृत्त कळता आले साधुरुपे गोकुळात

झाले विभोर प्रेमानंदे देती आशीर्वादII1II

कृष्ण जन्माचा दही काला आज शुभ दिन

जीव शिवासी भेटला आनंद भेदातीत

ब्रह्मरूपी दहीहंडी बांधली मिळे प्रसाद II2II

वेदांमध्ये म्हणती भगवान सामवेद

नक्षत्रांमध्ये चंद्र आहे इंद्रियांमध्ये मन

रुद्रामध्ये शंकर सेनानीं मध्ये स्कंदII3II

द्रौपदीच्या हाके सरशी येई धावुन

अर्जुनाचा होई सारथी सांगी गीतार्थ

सर्वज्ञ अंतर्यामी जपे प्राणीमात्र हीतII4II

समर धुरंधर युग नायक युगंधर

निष्काम कर्मयोगी जन्मला प्रतिकूल स्थितीत

संघर्षमय राहिला जीवनभर सततII5II

वेदशास्त्र संपन्न नृत्य संगीत निपूण

सर्वत्र असणारा रसिक निर्मोही अलिप्त

एक हाती बासरी दुसऱ्यात चक्र सुदर्शनII6II

निर्मळ हास्य सकारात्मकतेचे वर्तन

खट्याळ गंभीर मुत्सद्दी सुंदर त्रिभुवनांत

सर्वत्र वावरतो विविध भूमिकांतूनII7II

निसर्गाचा पूजक शिकवे पशुपालन

दुष्टांचा संहार करणारा क्रांती द्योत

कृष्णनिती मार्गदर्शक विश्वांस वरदानII8II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.

Cell.9373811677

प्रतिक्रिया व्यक्त करा