You are currently viewing विभागीय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्ग जलतरणपटूंचे यश

विभागीय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्ग जलतरणपटूंचे यश

विभागीय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्ग जलतरणपटूंचे यश

लीनांशा हितेश नाईक हिने पटकाविले तीन सुवर्ण सोबत इंडिव्हिज्युअल चॅम्पियनशिप ट्रॉफी

महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने माननीय श्री उमेश सकपाळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य विभागीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही स्पर्धा चिपळूण नगरपालिका रामतीर्थ जलतरण तलाव येथे पार पडली ज्यामध्ये सहभागी जिल्हे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड हे होते स्पर्धा ही दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी पार पडली या स्पर्धेमध्ये लीनांशा हितेश नाईक या चिमुकलीने सात वर्षाखालील गटात 25 मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात प्रथम क्रमांक पन्नास मीटर फ्री स्टाइल या प्रकारात प्रथम क्रमांक व 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला सोबतच इंडिव्हिज्युअल चॅम्पियनशिप ची मानकरी ठरली त्याचबरोबर उत्कर्ष विद्याधर निवतकर यांनी अकरा वर्षा वयोगटाखालील स्पर्धेत 200 मीटर वैयक्तिक मिडले मध्ये द्वितीय क्रमांक 50 मीटर बटरफ्लाय मध्ये द्वितीय क्रमांक व 50 मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला
या दोन्ही स्पर्धकांना सिंधुदुर्ग नगरी येथील जलतरण प्रशिक्षक श्री प्रवीण सुलोकार यांचे प्रशिक्षण लाभले ही दोन्ही चिमुकले या जलतरण तलावावर अनेक दिवसांपासून सराव करीत आहेत
या दोन्ही स्पर्धकांना सौ नीलिमा अडसूळ सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी श्री विजय शिंदे सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी श्री राहुल गायकवाड सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी श्री सचिन रणदिवे सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा