तरंदळे ग्रामपंचायतीतून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार;
सरपंच सुशील कदम यांच्याकडून प्रेरणादायी संदेश
कणकवली
तरंदळे ग्रामपंचायतीच्या वतीने ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच सुशील कदम व ग्रामस्थांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा गौरव करत त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी सरपंच कदम यांनी जिल्हा परिषद शाळेतील पट कमी होत चालल्याबद्दल खंत व्यक्त केली. “शाळा टिकवण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश द्यावा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा संदेशही त्यांनी दिला.

