*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या कवयित्री अदिती मसुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*देश माझा हिंदुस्थान*
देश माझा हिंदुस्थान
गाऊ त्याचे गुणगान ॥धृ ॥
विसरु सारे भेदभाव
सुजलाम् करुया गाव
मायभूचा करू सन्मान
देश माझा हिंदुस्थान ॥ १ ॥
शिकू विज्ञानाचे तंत्र
घेऊ विकासाचा मंत्र
वाढवू देशाची शान
देश माझा हिंदुस्थान ॥२ ॥
एकतेचा वाजवू ताशा
बोलू सौजन्याची भाषा
देशासाठी देऊया प्राण
देश माझा हिंदुस्थान ॥ ३ ॥
*✒️© सौ. आदिती धोंडी मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*
