ए लाजऱ्या फुला तू,
हरवून जाऊ नको,
पाकळ्या नाजूक त्या,
बिखरून देऊ नको..
ए लाजऱ्या फुला तू…
वाऱ्यासवे उडुनी येती,
भुंगे किटक किती,
फुलासी भुलूनी बसती,
गोंधळून जाऊ नको,
ए लाजऱ्या फुला तू…
गोड गुलाबी रंग,
मोहक तो तुझा सुगंध,
भाळती रूपगंधी ते,
मागे वळूनी पाहू नको,
ए लाजऱ्या फुला तू…
भले एकटेच फुलसी,
फांदीवरी कोमल त्या,
ऊन सावली साथ देती,
घाबरून राहू नको,
ए लाजऱ्या फुला तू…
(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६