तरंदळे प्रकल्प येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
ध्वजारोहण सरपंच सुशिल कदम यांच्या हस्ते, जलपूजन माजी सरपंच सुधीर सावंत यांच्या हस्ते संपन्न
तरंदळे
तरंदळे प्रकल्प परिसरात ७९ वा स्वातंत्र्य दिन अत्यंत आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. ध्वजारोहण तरंदळेचे सरपंच श्री. सुशिल कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रकल्पस्थळी जलपूजनाचा विधी संपन्न झाला, जो माजी सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष श्री. सुधीर सावंत यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास लघुपाटबंधारे उपविभागीय अधिकारी माणगावकर साहेब, परुळेकर साहेब, तसेच लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्रातून तरंदळे शाळेचे मुख्याध्यापक पोकळे सर, लोकरे मॅडम, शिक्षक डोईफोडे सर, बुचडे मॅडम यांची उपस्थिती लाभली.
तसेच कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन सावंत, ग्रामपंचायत सदस्य सुनीलदत्त जाधव, दीपक घाडीगावकर, तेजस सावंत, संजय परब, माजी पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका पावसकर, अंगणवाडी मदतनीस घाडीगावकर, आशा सेविका मुणगेकर, गावातील ज्येष्ठ नागरिक, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायक पद्धतीने पार पडले. ग्रामस्थांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि देशप्रेमाचे प्रदर्शन करून दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
