देवगड भंडारी समाजाचा पालकमंत्री राणेंना सन्मानपूर्वक आभार
देवगड :
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजन सभागृहाला स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख आणि अपराजित योद्धा मायनाक भंडारी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल देवगड तालुक्यातील भंडारी समाज बांधवांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या निर्णयामुळे ऐतिहासिक वारसा जपला जाईल आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळेल, असे समाज बांधवांनी सांगितले.
या वेळी बाळ खडपे, हेमंत करंगुटकर, विलास रुमडे, सुधीर मांजरेकर, वैभव करंगुटकर, हितेश शेडगे, प्रवीण शेडगे, सुनिल बिर्जे, संजय बोंबडी यांच्यासह सिंधुदुर्गातील अनेक ज्ञातीबांधव उपस्थित होते.
