You are currently viewing फोंडाघाट ग्राम महसूल व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या छतावर लोखंडी पत्रे बसवणाऱ्या अजित नाडकर्णी यांचा सन्मान

फोंडाघाट ग्राम महसूल व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या छतावर लोखंडी पत्रे बसवणाऱ्या अजित नाडकर्णी यांचा सन्मान

फोंडाघाट ग्राम महसूल व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या छतावर लोखंडी पत्रे बसवणाऱ्या अजित नाडकर्णी यांचा सन्मान

फोंडाघाट (ता. कणकवली)

येथील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या छतावर स्वखर्चाने लोखंडी पत्रे बसवून दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते श्री. अजित नाडकर्णी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. हा सन्मान मा. उपविभागीय अधिकारी कणकवली श्री. जगदीश कातकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.

यावेळी बोलताना अजित नाडकर्णी यांनी सांगितले की, “फोंडाघाट येथील तलाठी कार्यालय आणखी अद्ययावत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. लाईट गेल्यावर सर्व संगणकीय यंत्रणा ठप्प होते, त्यामुळे लवकरच लोकसहभागातून इन्व्हर्टरही उपलब्ध करून दिला जाईल.”

स्वातंत्र्यदिनी फोंडाघाट ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर प्रांताधिकारी श्री. कातकर साहेब व तहसीलदार श्री. देशपांडे साहेब यांच्या खास निमंत्रणावरून या सन्मान समारंभाला उपस्थित राहावे लागले, असेही नाडकर्णी यांनी नमूद केले.

“मंत्री नितेश राणे साहेब यांच्या प्रेरणेतूनच ही कार्य करण्याची उर्जा मिळते,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेवटी त्यांनी सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा