*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुशीला पिंपरीकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आयुष्य हे सुंदर*
हा जन्म मिळे का आपुल्या मर्जीवर
को-या पाटीवर नशिबाचे अक्षर ||धृ||
आई जन्मदात्री क्षणोक्षणी हृदयात
बाप पहाड ठायी ठायी आधारात
रूप तयांचे झळके, तेजस्वी ईश्वर
को-या पाटीवर….|१|
लाभते आम्हा का इथे चारतारुण्य
वाटते आम्हास शक्तीमान ना अन्य
शरीर ना शाश्वत, आठव ते नश्वर
को-या पाटीवर….|२|
काम क्रोध मोह लोभ, चिकटतात
संस्कार कुटुंबातले, उमटतात
जन्मास या प्रकाशाचे, द्यावे अत्तर
को-या पाटीवर….|३|
ओवी अभंग अभ्यास, मायबोलीचा
संत महात्मे अभिमान, या भूमीचा
गीत ऐक्याचे गाऊ चला निरंतर
को-या पाटीवर….|४|
वीरमाता पाठीशी, सैनिक पुत्राच्या
धडाडती तोफा, सीमेवर शत्रूच्या
झेलतो गोळ्या, वेळोवेळी छातीवर
को-या पाटीवर….|५|
तीच झाडे ती नदी ,पक्षी गाती गान
प्रभात नभीची, सुवर्ण नक्षी छान
माणूस माणसात ,बघ किती सुंदर
को-या पाटीवर नशिबाचे अक्षर ||६||
सुशीला हेमचंद्र पिंपरीकर, नाशिक
