You are currently viewing जल जीवन मिशन निधीसाठी राणेंकडून ठेकेदारांना आश्वासन

जल जीवन मिशन निधीसाठी राणेंकडून ठेकेदारांना आश्वासन

मालवण :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदारांनी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांसाठी केंद्रीय निधी मिळविण्याच्या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. या भेटीत ठेकेदारांनी कामांसाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींबाबत माहिती दिली. निधीअभावी कामांमध्ये विलंब होत असून, ठेकेदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

राणे यांनी या समस्येची गंभीर दखल घेत जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशी चर्चा करून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. “आपल्या जिल्ह्यासाठी आवश्यक निधी मिळवून देण्यासाठी मी सतत प्रयत्न करीन,” असे राणे म्हणाले.

या वेळी ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष दिलीप सावंत, बिपिन कोरगावकर, सागर मालवदे, प्रसाद मोरजकर, प्रदीप सामंत, सुभाष सावंत, राजेश तांबे आदी पदाधिकारी उपस्थित होते. राणे यांच्या आश्वासनामुळे ठेकेदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा