वैभववाडी :
वैभववाडी तालुक्यातील पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे उदघाटन उद्या (१५ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.
या उदघाटन सोहळ्यास खासदार नारायण राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उदय पाटील, कार्यकारी अभियंता रजेंद्र सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तालुकावासीयांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर यांनी केले आहे.
