You are currently viewing जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांचे वर्चस्व!

जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांचे वर्चस्व!

*विघ्नेश, यश, गार्गी, अथर्व, हर्ष, पार्थ, साक्षी विजेते*

सावंतवाडी :

श्री देव ब्राह्मण सेवा समिती, सुकळवाड, मालवण यांच्यातर्फे सुकळवाड येथे जिल्हास्तरीय शालेय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या तीन गटात खेळविण्यात आली. प्रत्येक गटात पाच पारितोषिके अशी एकूण पंधरा पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत जिल्ह्यातील चौ-याण्णव विदयार्थ्यांनी सहभाग घेतला.

सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीच्या अकरा विदयार्थी – विदयार्थिनींनी स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेतील एकूण पंधरा पारितोषिकांमधील तब्बल सात पारितोषिके मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी पटकावली. पारितोषिकप्राप्त विदयार्थ्यांना रोख रक्कम, चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

पहिली ते चौथी – द्वितीय क्रमांक विघ्नेश अंबापूरकर

पाचवी ते सातवी – प्रथम क्रमांक यश सावंत, द्वितीय क्रमांक गार्गी सावंत, चौथा क्रमांक अथर्व वेंगुर्लेकर

आठवी ते दहावी – द्वितीय क्रमांक हर्ष राऊळ, चौथा क्रमांक पार्थ गावकर, पाचवा क्रमांक साक्षी रामदुरकर

ॲकेडमीचे इतर विदयार्थी चिदानंद रेडकर, भुमि कामत, विराज दळवी, वेदांत डांगी यांनी पाच राऊंड्समध्ये चार राऊंड्स जिंकून चांगला खेळ केला. सर्व विदयार्थ्यांना बाळकृष्ण पेडणेकर आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. सर्व स्तरातून विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा