सिंधुदुर्गनगरी
जिल्हा क्रीडा संकुल समिती, सिंधुदुर्ग यांच्या अखत्यारितील जलतरण तलाव कंत्राटी पद्धतीने चालविण्यासाठी पात्र संस्था व्यक्तींकडून मोहर बंद निविदा मागविण्यात येत आहे. तरी निविदेच्या अटी व शर्तींसह कोरे निविदा फॉर्म जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दिनांक 11 फेब्रुवारी 2021 रोजीपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे विजय शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी हे कळवितात.