You are currently viewing कुडाळ नगरपंचायतीचा सांस्कृतिक सोहळा..

कुडाळ नगरपंचायतीचा सांस्कृतिक सोहळा..

महापूजा, भजने आणि फुगड्यांनी सजला वर्धापन दिन

 

कुडाळ (प्रतिनिधी) – कुडाळ नगरपंचायतीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने नगरपंचायतीच्या लोकप्रतिनिधींसह कर्मचाऱ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग घेत सर्वांना एकत्र आणणारा सोहळा अनुभवला.

कुडाळ नगरपंचायतीची स्थापना १० ऑगस्ट २०१५ रोजी झाली होती. त्यानंतर दरवर्षी हा वर्धापन दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा केला जातो. यंदाही या परंपरेनुसार, सत्यनारायण महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

महापूजेचा विधी नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर शिरवलकर व उपजिल्हाप्रमुख श्री. आनंद शिरवळकर यांच्या हस्ते पार पडला. पूजेनंतर महिला भजन मंडळाने भावपूर्ण भजनसंपदा सादर केली, तर भैरववाडी येथील फुगडी संघाने पारंपरिक फुगडी सादर करत वातावरणात उत्साह निर्माण केला.

यानंतर स्थानिक कलाकारांनी भजने सादर केली आणि लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून आपली कला सादर केली. या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नगरपंचायतीचे कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वर्धापन दिन साजरा केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा