सोहम देशमुख विजेता;
आयडियल चेस अकॅडमी वेंगुर्ला आयोजित १९ वर्षाखालील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार
वेंगुर्ला
आयडियल चेस अकॅडमी, वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित १९ वर्षाखालील मुला-मुलींसाठी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा रविवारी, १० ऑगस्ट २०२५ रोजी सिद्धिविनायक मंगल कार्यालय, भटवाडी वेंगुर्ला येथे पार पडली. या स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागांतून एकूण १४० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, सावंतवाडी येथील १३ वर्षांचा कु. सोहम देशमुख याने उत्कृष्ट खेळ करत सर्व आठ फेऱ्यांमध्ये आठ गुण मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याला चषक व रोख रक्कम असे बक्षीस देण्यात आले.
आयडियल चेस अकॅडमीच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील बुद्धिबळपटूंना व्यासपीठ उपलब्ध झाले असून, युवकांमध्ये बुद्धिबळाबद्दलची आवड वाढीस लागणार आहे, असे मत यावेळी आयोजकांनी व्यक्त केले.

