You are currently viewing जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहास ‘मायनाक भंडारी’ नाव

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहास ‘मायनाक भंडारी’ नाव

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहास ‘मायनाक भंडारी’ नाव;

१५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

ओरोस |

ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जुने नियोजन सभागृह अद्ययावत स्वरूपात नूतनीकरण करण्यात आले असून, या सभागृहास छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांचे नाव देण्याची घोषणा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केली आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता या सभागृहाचे उद्घाटन पालकमंत्री राणे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कुडाळ तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष अतुल बंगे यांनी दिली.

शासकीय पातळीवर भंडारी समाजाच्या ऐतिहासिक पराक्रमाची नोंद व्हावी, यासाठी सभागृहास मायनाक भंडारी यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीस पालकमंत्र्यांनी मान्यता दिल्याने संपूर्ण भंडारी समाजाचा गौरव झाल्याचे श्री. बंगे यांनी सांगितले.

या सभागृहाची पाहणी कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाचे अध्यक्ष श्री. अतुल बंगे, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. राजु गवंडे, आणि सचिव श्री. शरद पावसकर यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याशी या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली.

या ऐतिहासिक कार्यक्रमाला भंडारी समाजाच्या सर्व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. बंगे यांनी पत्रकार परिषदेत केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा