* पीएम श्री बांदा नं.१ केंद्रशाळेत अनोखे रक्षाबंधन*
*बांदा*
श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा बहिण भावाच्या प्रेमाचा नाते अतुट करणारा रक्षाबंधन सण बांदा केंद्रशाळेत स्काऊट गाईड पथकामार्फत अनोख्या पद्धतीने साजरा केला .
स्काऊट गाईड उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भारत मातेची अहोरात्र सेवा बजावत असलेल्या सिमेवरील सैनिकांना पोस्टाने राख्या पाठवल्या आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणातील झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून रक्षाबंधन सणाच्या दिवशी शाळा परिसरातील झाडांना पर्यावरण पूरक स्वनिर्मित राख्या बनवून झाडांना बांधल्या.या दिवशी विद्यार्थ्यांनी बांदा पोलिस स्टेशन मध्ये उपस्थित राहून पोलिस कर्मचारी यांना राख्या बांधल्या, बांदा ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी, पोस्टमन,तसेच बांदा गावांत कामानिमित्त स्थायिक झालेले परप्रांतीय बांधव यांनाही या पवित्र दिनी राखी बांधली.शाळेतही सर्व विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना राखी बांधली. या उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना बांद्यातील प्रसिद्ध समर्थ हाॅटेलमार्फत अल्पोपहाराची सोय केली. बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांमार्फत शालेय अभ्यासक्रमाबरोबरोबर सामाजिक उपक्रम राबवत असल्याबद्दल शाळेचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.
शाळेतील स्काऊट गाईड मार्फत राबविण्यात आलेल्या या अनोख्या रक्षाबंधन कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर,स्काऊटर शिक्षक जे.डी.पाटील, पदवीधर शिक्षक उदय सावळ, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस, प्रसेन जित ,स्नेहा घाडी, शुभेच्छा सावंत,जागृती धुरी, कृपा कांबळे, मनिषा मोरे, सुप्रिया धामापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
