“शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन सोमवारी” – संदेश पारकर
ओरोस
महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोमवार दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.
तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आजी माजी शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि तमाम शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संदेश पारकर यांनी केले आहे.
