निलेश राणे यांनी केले सागराचे पूजन; मच्छिमार, व्यापारी, नागरिक यांच्यासोबत सागराला नारळ अर्पण..
मालवण :
शिवकालीन ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मालवणात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होत असताना आमदार निलेश राणे यांनीही समुद्राचे पूजन करत मच्छिमार, व्यापारी आणि नागरिक यांच्या सोबत श्रीफळ अर्पण केले. मच्छिमारांची, व्यापाऱ्यांची, तमाम नागरिकांची भरभराट होऊदेत असे साकडे यावेळी सागराला घालण्यात आले. मालवण बंदरजेटी येथे शहरातील मालवण व्यापारी बांधव बाजारपेठ हनुमान मंदिर येथून पारंपरिक वाद्य मिरवणूकीने अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या सोबतीने आले. श्रीफळ पूजन झाले. दरम्यान किल्ले सिंधुदुर्ग येथून मानाचे श्रीफळ समुद्राला अर्पण झाले. त्यानंतर मालवण बंदर जेटी येथूनही सर्वांनी सागराला श्रीफळ अर्पण केले.
या सोहळ्यात आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हा प्रमुख विश्वास गांवकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, राजा गांवकर, शिक्षकेतर संघटना जिल्हा संघटक किसन मांजरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, शहरप्रमुख दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, परशुराम पाटकर, गणेश प्रभुलकर, आबा हडकर, शर्वरी पाटकर, सूर्यकांत फणसेकर, हरेश देऊलकर, मयू पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, उपजिल्हा प्रमुख निषय पालेकर, तालुकाप्रमुख अभि लाड, युवासेना पदाधिकारी सोनाली पाटकर, शिवसेना जिल्हा संघटक अंजना सामंत, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर, महिला तालुकाध्यक्ष मधुरा तुळसकर, मंदार लुडबे, अरुण तोडणकर, राजू बिडये, यांसह, व्यापारी, नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
