वाकड, चिंचवड-
वाकड येथील आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री भागवत कोल्हे,यांचे मार्गदर्शन,उपाध्यक्ष व कार्यवाह श्री मुरलीधर लहाने, सचिव व सदस्य पर्यटन श्री सुरेश बोरकर, तसेच श्री बराटे खजिनदार,यांचे सहकार्याने पर्यटन समिती प्रमुख श्री अशोक बोंडे यांनी एक रात्र व दोन दिवस 32 शिराळा सहलीचे यशस्वी आयोजन केले. सहलीत एकूण 49 जणांनी सहभाग नोंदवला.28 जुलैला रोजी सकाळी सहा वाजता निघून प्रथम आदमपूर येथे धनगर समाजातील एक मराठी संत श्री बाळू मामा यांची समाधी दर्शन घेवून प्रसाद घेतला. संध्याकाळी महालक्ष्मी दर्शन घेऊन रात्री कोल्हापुर कण्हेरी मठ येथे मुक्काम केला. सकाळी 6.15 वाहता 32 शिराळा साठी निघालो प्रवासात ज्येष्ठ नागरिकांनी भक्तिगीते, एकांकिका, कथा,सांगितल्या.
शिराळा येथे अंबाबाईच्या मंदिरात दर्शन घेउन गावातून नागमंडळ त्यांचे कार्यकर्ते व सदस्य त्यांनी पकडलेले नाग, साप अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात आणताना पाहिले,त्याठिकाणी त्यांची पूजा करून निघून जात होते प्रसंगी साधारणपणे 100 ते 125 Dj म्युझिक चा दणादणाट होता.
बसेस बंद असल्याने बस स्टँड वर महिलांनी नागपंचमी चे पारंपरिक गाणे फेर धरून म्हंटले.
परतीच्या प्रवासात खेड शिवापूर येथील त्रिमंदिर पाहून व दर्शन घेवून दिनांक 29 जुलैला रात्री 11 वाहता वाकड पुणे येथे पोहोचले.
प्रसिद्धी प्रमुख श्री अशोक बोंडे व सौ हेमांगी बोंडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधी ला सांगितले.

