*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्या ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”बंधन”*
अंतःकरणातून स्वीकारावे स्वेच्छे बंधन
बंधन बनवते समृद्ध सजग सुसंस्कृत IIधृII
बंधन नात्याचं संस्कृतीचं विचारांचं सूत
बंधू भगिनी प्रेम भावनांचे प्रतीक चिन्हं
जिव्हाळ्याचे अतूट विश्वासाचे आहे नातंII1II
रक्षाबंधन बहिणींसाठी नैतिक वचन
बंधू भावाचे रक्षण विचारांचे भावबंधन
आधार आस्था भावना संगम असे वर्तनII2II
संस्कृतीची परंपरा शिस्त म्हणजे बंधन
एकमेकांतील सौहार्द प्रेम होते वृद्धिंगत
मिळे आंतरिक बळ सुविचारांना प्रोत्साहनII3II
बंध मुक्त होणे हे स्वातंत्र्याचे लक्षण
योग्य बंधनात जगणं मानवतेचे द्योत
शिष्टाचार संहिता बंधन असावे वर्तनात II4II
शेताला असतो बांध करितो रक्षण
नित्य नैमित्तीक स्वच्छता असावे बंधन
ईश्वरापुढे करावे हात जोडून वंदनII5II
श्री अरुण गंगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.

