हुमरमळा (वालावल) गावातील सखिग्रामसंघ महीलांचा राजीनामा नाट्यावर पडदा!
जिल्हा व्यवस्थापक मिस निलेश वालावलकर आणि तालुका अभियान व्यवस्थापक गणेश राठोड यांची यशस्वी मध्यस्थी!
कुडाळ (प्रतिनिधी)
गेले चार महीने प्रभाग समिती अध्यक्ष आणि हुमरमळा सखि ग्रामसंघाच्या वादात राजीनाम्या पर्यंत टोकाची भुमिका घेतल्याने अखेर आज सखी ग्रामसंघाच्या सभेत वरीष्ठांनी लक्ष घातल्याने अखेर पडदा पडला
हुमरमळा वालावल गावातील मा सरपंच सौ अर्चना बंगे यांनी जिल्हा बॅंक अध्यक्ष मनिश दळवी यांचा महीलांच्या वतीने केलेला सत्कार, सी आर पी यांना होत असलेला त्रास, तालुका व्यवस्थापक गणेश राठोड यांच्या कार्यालयात दीलेली सखी ग्रामसंघाच्या महीलांनी दीलेली भेट, सखी ग्रामसंघाची हुमरमळा येथे झालेली सभा व महीला आरोग्य शिबीर यावर प्रभाग समिती अध्यक्ष यांनी केलेली ग्रुपवर आणि सभेच्या ठीकाणी केलेली वक्तव्य यासाठी सौ बंगे यांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री उदय पाटील यांचे कडे सभेला मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती त्यानुसार आज श्री वालावलकर, श्री राठोड, श्री मेस्त्री, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, ग्रामसेविका अपर्णा पाटील यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन केले होते यावेळी सीआर पी व सखि ग्रामसंघाच्या महीलांनी झालेल्या घटनेचा एकुण सविस्तर माहिती दीली यावर आॅक्टोंबर मध्ये दोन दिवस ट्रेनिंग देऊन सखी ग्रामसंघाला किंवा सीआर पी यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही वरीष्ठ घेऊ असे आश्वासन दिले यावेळी सखी ग्रामसंघाच्या अध्यक्ष श्रीम सुष्मा वालावलकर, सचिव सौ परब, सौ अर्चना बंगे, मानसी वालावलकर, दीपा गुंजकर, व जवळपास 70 महिला उपस्थित होत्या

