सीमा तपासणी नाका रखडल्याने कोट्यवधींचे नुकसान;
प्रकल्प त्वरीत पूर्ण करून जागेचा उपयोग करण्याची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
बांदा
सीमा तपासणी नाक्यासाठी तब्बल अडीचशे कोटी रुपये खर्च करूनही आजपर्यंत टोल नाका सुरू करण्यात आलेला नाही. यामुळे राज्याच्या आणि स्थानिक जनतेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान सातत्याने होत आहे. शासनालाही विविध उत्पन्न स्रोत बंद राहिल्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
सद्भाव आणि सुवर्णमिल्का या कंपन्यांमधील आर्थिक व्यवहार पूर्ण करून हा प्रकल्प तातडीने पूर्णत्वास न्यायावा, अशी मागणी नागरिकांतून आणि स्थानिक प्रतिनिधींकडून करण्यात येत आहे.
या ठिकाणी शासनाने टोल नाक्याऐवजी शाळा, रुग्णालये, मार्केट यांसारखे लोकहिताचे प्रकल्प सुरू करून जागेचा सकारात्मक उपयोग करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. शासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालून आणखी नुकसान टाळावे आणि प्रकल्पाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे.

