You are currently viewing वेंगुर्ला येथे आयुष चॅलेंजर मित्रमंडळ, वेंगुर्ला व ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग आयोजित रक्तदान शिबिर गुरुवारी

वेंगुर्ला येथे आयुष चॅलेंजर मित्रमंडळ, वेंगुर्ला व ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग आयोजित रक्तदान शिबिर गुरुवारी

*कै.रामा शेणई व कै. ऋतिक शिरोडकर यांच्या स्मरणार्थ आयोजन*

 

वेंगुर्ला:

वेंगुर्ला येथे कै.रामा शेणई व कै.ऋतिक शिरोडकर यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वेंगुर्ला येथील आयुष चॅलेंजर मित्रमंडळ परबवाडा, व ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांनी सदर शिबिराचे आयोजन केले असून छत्रपती मित्रमंडळ भटवाडी, जबरदस्त मित्रमंडळ राऊळवाडा, उभादांडा मित्रमंडळ यांनी सदर रक्तदान शिबाराच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले आहे. सदर शिबिराचे आयोजन जि. प. शाळा, वेंगुर्ले नं. १ येथे गुरुवार दिनांक ०७ ऑगस्ट रोजी सकाळी ९.५० ते दुपारी १.५० वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

“रक्तदान हेच श्रेष्ठदान” हे ध्यानात ठेऊन सामाजिक व्यवस्थेमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेली रक्ताची मागणी लक्षात घेता जास्तीतजास्त रक्तदात्यांनी सदर शिबिरामध्ये रक्तदान करून शिबिर यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नाना राऊळ 94 0416 95 55, मंदार किनळेकर 9421262412 यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा