You are currently viewing दिव्यांग बांधवांचा वराड गावामध्ये मेळावा संपन्न

दिव्यांग बांधवांचा वराड गावामध्ये मेळावा संपन्न

*दिव्यांग बांधवांचा वराड गावामध्ये मेळावा संपन्न*

कणकवली

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या वतीने मंगळवार दिनांक 06/08/2025 रोजी वराड गावातील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सकाळी 11.00 वाजता संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये वराड गावचे सरपंच माननीय शलाका रावले मॅडम, उपसरपंच माननीय गोपाळ परब सर, ग्रामपंचायत अधिकारी उमेश खोबरेकर सर तसेच संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर, संस्था कर्मचारी प्रणाली दळवी,विशाखा कासले,हर्षल खरात, विठ्ठल शिंगाडे, हेल्थ केअरचे सदडेकर सर व सदडेकर मॅडम व हेल्थ केअरचे कर्मचारी, आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच सरपंच रावले मॅडम यांनी दिव्यांग बांधवांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. उपसरपंच परब सर यांनी देखील दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. व शुभेच्छा दिल्या. संस्था कर्मचारी दळवी मॅडमानी संस्थेचे अहवाल वाचन केले. हेल्थ केअरचे सदडेकर सर यांनी हेल्थ विषयी माहिती सांगितली व मार्गदर्शन केले.दिव्यांग बांधवांना गाडीसाठी फॉर्म देण्यात आले व त्यासंबंधी सर्व माहिती देण्यात आली. पाच दिव्यांग बांधवांचे ऑनलाईन प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे घेण्यात आली.Live Your Best Life यांच्या माध्यमातून सर्व दिव्यांग बांधवांची व त्यांच्या पालकांची हेल्थ तपासणी करण्यात आली. दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने योगेश परब यांना सायकल देण्यात आली. या मेळाव्याला 40 हून जास्त दीव्यांग उपस्थित होते.चहा व नाश्ताची व्यवस्था वराड ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली. संस्थेच्या वतीने दिव्यांग बांधवांना भेटवस्तू देण्यात आल्या.
संस्था कर्मचारी दळवी मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा