१७ लाखाची तरतूद,१०० लाभार्थी महिलांना देणार लाभ…
ओरोस
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात(२०२०-२१मध्ये) “परसबाग कुक्कुटपालन” योजना हि नवी योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी १७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर या योजनेचा जिल्ह्यातील १०० महिला लाभार्थींना लाभ दिला जाणार आहे. अशी माहिती पशुसंवर्धन सभापती तथा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत दिली.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीची सभा पशुसंवर्धन सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील बॅरिस्टर नाथ पै समिती सभागृहात संपन्न झाली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप शिंपी, सदस्य रोहिणी गावडे, मनस्वी घारे, स्वरूपा विखाळे, मानसी धुरी, आदींसह खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.