You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १०९ वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १०९ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य लेखक कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।___________________________

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १०९ वे

अध्याय – १९ वा , कविता – १ ली

___________________________

 

अध्याय एकोणवीसवा आरंभ आहे ।श्री गजानन लीला वर्णितो आहे । मनात अपार आनंद आहे । ही लेखन सेवा

करतांना ।। १ ।।

 

महाराज शेगावी असतांना । भक्त एक आला दर्शना ।

स्वामींच्या वंदावे चरणा । असे हीच त्याची कामना ।।२ ।।

 

गर्दे काशिनाथ त्याचे नाव । मनी मोठा भक्ती भाव । साधा सरळ स्वभाव । म्हणे तो, दर्शने झालो धन्य मी ।।३ ।।

 

काशीनाथाच्या पाठीस भली । कोपरखळी मारिली ।

समर्थांची कृपा झाली । म्हणे, जा,तुझा हेतू पुरला,वाट पाहे तारवाला ।। ४।।

 

काशीनाथपंत खामगावी आला । तो त्यास दिसला । दारात उभा तारवाला । नेमणूक मजकूर वाचला त्याने ।।५।।

 

स्वामींच्या शब्दातले गूढ कळले। स्वामींनी अंतरज्ञानाने जाणले । पंतांनी स्मरण केले। स्वामी गजाननाचे ।। ६।।

 

एकदा स्वामी नागपुरा आले । गोपाळ बुटीकडे उतरले ।

सदन हे अति भव्य भले । या वाड्यात स्वामींना जणू बुटीने

कोंडीले ।।७।।

*********************

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास ।।

___________________________

कवी अरुणदास – अरुण वि.देशपांडे -पुणे

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा