गांजा बाळगल्याप्रकरणी आरोपी प्रितेश मसुरकर यास ओरोस येथील विशेष न्यायालयाकडून जामीन मंजूर
ॲड. राहुल जाधव यांनी केला होता युक्तिवाद
कुडाळ
कुडाळ येथील गांजा बाळगल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रितेश रोहिदास मसुरकर याला ओरोस येथील मे. विशेष न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी सोमवारी जामीनावर सोडण्याचा आदेश केलेला आहे. आरोपी याच्या ताब्यातून सुमारे १५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला होता. आरोपी याला गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क), २० (ब) (ii) (ब), २५ अन्वये कुडाळ पोलीसांनी अटक करुन २० ते २३ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत व त्यानंतर मे. विशेष न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. ॲड. राहुल रमाकांत जाधव व ॲड.फैसल अन्वर बेग यांनी आरोपी तर्फे काम पाहिले.
ॲड. राहुल जाधव यांनी आरोपी तर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन विशेष न्यायालयाने आरोपी याची सोमवारी जामीनावर सुटका करण्याचा आदेश केला.
