कुडाळ :
पावशी येथे मुंबई गोवा महामार्गावर सातेरी मंदिराजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. यात अल्टो चालक जखमी झाला आहे. या अपघातास महामार्ग ठेकेदार जबाबदार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अल्टो कार चालक हा सावंतवाडीच्या दिशेने जात होता. मात्र, वेताळबांबर्डे पुलानजिक ठेकदाराने मार्ग परिवर्तीत केल्याने अल्टो कार चालकाने गाडी विरुद्ध दिशेने वळवली. अल्टो कारचालक एफराज काजरेकर यांची गाडी पावशी सातेरी मंदिराजवळ आली असता भरधाव वेगाने येणारी आय २० (एम. एच. ३१ इ. के. ८१०८) चारचाकी गाडीची जोरदार धडक अल्टोकारला (एम. एच. ०७ एबी ०१७५) बसली. यात अल्टो कार चालक जखमी झाला. तर दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.